Breaking

Thursday, April 29, 2021

अत्यवस्थ रुग्णांना बनावट रेमडेसिविर पुरवणाऱ्या टोळीचा भांडाफोड https://ift.tt/3vuzmT1

कोटद्वार, : दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रान्चनं केलेल्या कारवाईत धक्कादायक बाब समोर आलीय. रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या दिल्ली पोलिसांनी केलाय. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना उत्तराखंडच्या कोटद्वारमधून अटक केलीय. करोना संक्रमणासारख्या कठीण प्रसंगी ही टोळी गरजूंना २५ हजार रुपयांना एक बनावट रेमडेसिविर इंजेक्शन विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. गुप्तपणे मिळालेल्या माहितीनंतर, क्राईम ब्रान्च डीसीपी यांच्या टीमनं ही कारवाई केली. कोटद्वारच्या संबंधित कारखान्यावर छापा मारत पोलिसांनी इथून बनावट इंजेक्शन, पॅकिंग डब्बे आणि मशीन जप्त केल्या आहेत. तसंच पोलिसांनी आरोपींकडून रेमडेसिविरचे १९६ बनावट इंजेक्शन जप्त केले आहे. सोबतच इंजेक्शन पॅक करण्यासाठी वापरले जाणारे ३००० वायल्सही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी एक ट्विट करून नागरिकांनाही जागरूक करण्याचा प्रयत्न केलाय. या ट्विटमध्ये त्यांनी बनावट रेमडेसिविर कशा ओळखायच्या याची माहिती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, हा प्रकार उघड होत असतानाच दुसरीकडे उत्तराखंडमध्ये नागरिकांना रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसताना दिसतंय. उत्तराखंडमध्ये गेल्या मंगळवारी ७५०० रेमडेसिविर इंजेक्शन पोहचले होते. यामुळे १५०० ते ३००० रुग्णांना याची मदत होई शकेल. केंद्राकडून राज्यांना देण्यात आलेल्या कोट्यानुसार, इंजेक्शनचं वितरण सुरू आहे. देशातील अनेक राज्यांत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय. करोना लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसह अनेक राज्यांनी १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात असमर्थता दर्शवली आहे. त्यातच ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि रुग्णांना उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तूंची, औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार मानवतेलाही काळिमा फासतोय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vvbDSS

No comments:

Post a Comment