कोलकाता : दरम्यान सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. या टप्प्यात ३४ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मालदा (भाग १), कोलकाता दक्षिण, मुर्शिदाबाद (भाग १), पश्चिम वर्धमान (भाग १) आणि दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यांतील ३४ विधानसभा मतदार संघांतील ८६ लाख ७८ हजार २२१ मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत. LIVE अपडेट : - तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकाताच्या भवानीपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. 'प्रत्येक दिवशी लोकांचा मृत्यू होत आहे परंतु, केंद्र सरकार निवडणुकीत व्यग्र आहे' असं म्हणतानाच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचंच सरकार बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अगोदरप्रमाणे आजच्या टप्प्यातील मतदारांनाही मतदानाचं आवाहन केलंय. तसंच कोविड नियमांची अंमलबजावणी करण्याचीही आठवण मोदींनी करून दिलीय. - सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं दिसून येतंय - या टप्प्यात एकूण ८६ लाख ७८ हजार २२१ मतदार आहेत. यातील ४४ लाख ४४ हजार ६३४ पुरुष तर ४२ लाख ३३ हजार ३५८ महिला आहेत. तिसऱ्या लिंगाचे २२९ मतदार आहेत. - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७.०० वाजता सुरूवात झालीय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aDTjPw
No comments:
Post a Comment