नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्या करोना लसीकरणा दरम्यान लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणातील सहभागींची संख्या दिवसेंदिवस कमी झालेली आढळून येतेय. तर दुसरीकडे, रविवारी एकाच दिवसात तब्बल ४४५४ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत देशात करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची एकूण संख्या तीन लाखांच्याही पुढे गेलीय. आत्तापर्यंत देशात एकूण ३ लाख ०३ हजार ७२० नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. याअगोदर १८ मे रोजी ४५२९ मृत्यूंसहीत करोनामृत्यूनं नवा रेकॉर्ड गाठला होता. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (२३ मे २०२१) २ लाख २२ हजार ३१५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ वर पोहचलीय. देशात सध्या २७ लाख २० हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ०२ हजार ५४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आत्तापर्यंत २ कोटी ३७ लाख २८ हजार ०११ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ३७ लाख २८ हजार ०११
- उपचार सुरू : २७ लाख २० हजार ७१६
- एकूण मृत्यू : ३ लाख ०३ हजार ७२०
- करोना लसीचे डोस दिले गेले : १९ कोटी ६० लाख ५१ हजार ९६२
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wrgoNE
No comments:
Post a Comment