चंदीगड : वादग्रस्त कृषी कायद्यांसंबंधी केंद्र सरकारसोबत चर्चा पुन्हा एकदा नव्यानं सुरू करण्यासाठी तयार असल्याचं भारतीय शेतकरी संघटनेचे नेते यांनी रविवारी म्हटलंय. परंतु, ही चर्चा नव्या मागे घेण्याविषयी असायला हवी, असंही त्यांनी म्हटलंय. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी आंदोलन स्थळावरून माघारी परतण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 'पत्राला उत्तर नाही' जेव्हा सरकारला चर्चा करावीशी वाटेल तेव्हा संयुक्त शेतकरी संघटना सरकारशी चर्चेसाठी तयार असेल, असं टिकैत यांनी म्हटलंय. 'सरकार चर्चेसाठी केव्हाही तयार आहे, आम्ही केवळ एक कॉल दूर आहोत' असं सरकारनं म्हटलं होतं. आता आम्ही पत्र लिहिलंय परंतु, अद्याप आम्हाला या पत्राला उत्तर मिळालेलं नाही, असंही राकेश टिकैत यांनी म्हटलंय. स्वातंत्र्यसैनिक शहीद भगत सिंह यांचा भाचा अभय सिंह संधू यांचा नुकताच कोविड संक्रमणासहीत इतर समस्यांमुळे मृत्यू झाला. संधू यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राकेश टिकैत मोहालीमध्ये दाखल झाले होते. यावेळी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय. हिस्सार भागात तीव्र आंदोलन दुसरीकडे, हरयाणातल्या हिसार भागात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय. जिल्ह्यात गेल्या रविवारी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात ३०० हून अधिक शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन आणखीन तीव्र झालंय. २६ मे रोजी '' करोना संक्रमण काळातच गेल्या सहा महिन्यांहून अधिक दिवस शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. आहोत, असंही टिकैत यांनी म्हटलंय. 'आंदोलकांच्या लसीकरणाची सोय नाही' करोना संक्रमणा दरम्यान आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या आंदोलकांना १५ दिवस आयसोलेट केलं जातं, असं म्हणतानाच सरकारनं आंदोलकांच्या लसीकरणासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2RGnP4P
No comments:
Post a Comment