Breaking

Wednesday, May 26, 2021

मास्क नव्हतं म्हणून पोलिसांनी हातापायाला खिळे ठोकले, तरुणाचा आरोप https://ift.tt/2QUmWoS

बरेली : करोना संक्रमणकाळात उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका तरुणानं पोलिसांवर केलेला आरोप अतिशय धक्कादायक आहे. परिधान केलं नव्हतं म्हणून अगोदर पोलिसांनी केली आणि पोलिसांना प्रतिकार केल्यावर पोलिसांनी हातापायाला , असा गंभीर आरोप एका तरुणानं केला आहे. तरुणाचा गंभीर आरोप संबंधित घटना २४ मे रोजी घडल्याचं समजतंय. २६ मे रोजी रंजीत नावाचा हा स्थानिक तरुण वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांची तक्रार घेऊन दाखल झाला होता. पोलिसांनी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून आपल्या हातापायाला खिळे ठोकल्याची तक्रार त्यानं केली. रात्री आपल्या घराच्या बाहेर मास्कशिवाय बसला असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. इथे त्याच्या हातापायाला खिळे ठोकण्यात आले, असा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांचं स्पष्टीकरण पोलिसांनी मात्र तरुणानं केलेल्या आरोपांना धुडकावून लावलंय. मास्क परिधान करण्यास सांगितल्यानंतर तरुणानं पोलिसांशी हुज्जत घालत घटनास्थळावरून पळ काढला, असं पोलिसांनी म्हटलंय. वरिष्ठ पोलीस अधीक्षक रोहित सिंह संजवाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतर या तरुणावर आठ वेगवेगळ्या कलमांखाली करण्यात आला आहे. अटकेपासून वाचण्यासाठी पोलिसांनी आपल्यावर हल्ला केल्याचा बनाव त्यानं केला आहे. अटकेपासून वाचण्यासाठी या तरुणानं स्वत:च्या हातापायाला खिळे मारून घेतल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय. तरुणाविरुद्ध या अगोदरही काही तक्रारी दाखल आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिलीय. २०१९ साली मंदिरातील एक मूर्ती तोडण्याचा गुन्हा या तरुणावर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला काही दिवस तुरुंगातही राहावं लागलं होतं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2QZssGW

No comments:

Post a Comment