नवी दिल्ली : परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून कॅरेबियन देशांचे नागरिकत्व घेऊन केंद्र सरकारला गुंगारा देणारा पीएनबी बँक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याचा खेळ खल्लास झाला आहे. डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आल्यानंतर चोक्सीला भारताच्या स्वाधीन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. चोक्सीच्या प्रत्यार्पणाबाबत 'अॅंटिग्वा अँड बार्बुडा'च्या पंतप्रधानांना महत्वाचे विधान केले आहे. मेहुल चोक्सीला यापूर्वी फरार म्हणून न्यायालयाने घोषित केले आहे. गेली चार वर्षे केंद्र सरकार पीएनबी घोटाळ्यातील फरार उद्योजकांचा शोध घेत आहे. इंटरपोलकडून मेहुल चोक्सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र 'अॅंटिग्वा अँड बार्बुडा'चे नागरिकत्व असल्याने तो या देशात आश्रय घेऊन राहत होता. गेल्या रविवारी (२३ मे २०२१) चोक्सीने 'अॅंटिग्वा अँड बार्बुडा'मधून पळ काढला होता. तो अचानक बेपत्ता झाल्याने अॅंटिग्वाच्या जॉन्सन पॉइंट पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मेहुल चोक्सीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. अॅंटिग्वान्यूजरूम या स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार चोक्सी रविवारपासून बेपत्ता झाला होता. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही त्यामुळे अॅंटिग्वा पोलिसांनी चोक्सीची शोध मोहीम सुरु केली होती. डाॅमिनिकामध्ये बुधवारी पोलिसांनी केली. 'दि अॅंटिग्वा न्यूज रुम या वृत्त एजन्सीच्या वृत्तानुसार मेहुल चोक्सी सध्या डॉमिनिका पोलिसांच्या क्रिमिनल इन्व्हेस्टीगेशन डिपार्टमेंटच्या (सीआयडी) कस्टडीमध्ये आहे. यानंतर मात्र अँटिग्वा अँड बार्बुडा सरकार सतर्क झाले आहे. चोक्सीला भारताच्या स्वाधीन करण्याबाबत सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. 'अॅंटिग्वा अँड बार्बुडा'चे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊन यांनी फरार उद्योजक मेहुल चोक्सीला लवकरच भारताच्या स्वाधीन केलं जाईल, असे महत्वाचे विधान केले आहे. डॉमिनिकाने चोक्सीला ताब्यात ठेवावे आणि थेट भारताच्या स्वाधीन करावे, असे अँटिग्वा अँड बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊन यांनी म्हटलं आहे. चोक्सीला 'अॅंटिग्वा अँड बार्बुडा'मध्ये पुन्हा आश्रय दिला जाणार नाही, असे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे. चोक्सीच्या प्रत्यार्पणाबाबत गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारच्या 'अॅंटिग्वा अँड बार्बुडा' सरकार वाटाघाटी सुरु आहेत. आता मेहुल चोक्सीचे पलायन आणि अटकेनंतर 'अॅंटिग्वा अँड बार्बुडा'कडून चोक्सीला भारताच्या स्वाधीन करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरच चोक्सीला भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34l9XzB
No comments:
Post a Comment