न वी दिल्ली : देशात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या आणि मृत्यूंच्या संख्येत मे महिन्याच्या अखेरीस घट झालेली दिसून येतेय. ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (३० मे २०२१) १ लाख ५२ हजार ७३४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ३१२८ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ३८ हजार ०२२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८० लाख ४७ हजार ५३४ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ५६ लाख ९२ हजार ३४२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या २० लाख २६ हजार ०९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख २९ हजार १०० वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ८० लाख ४७ हजार ५३४
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ५६ लाख ९२ हजार ३४२
- उपचार सुरू : २० लाख २६ हजार ०९२
- एकूण मृत्यू : ३ लाख २९ हजार १००
- करोना लसीचे डोस दिले गेले : २१ कोटी ३१ लाख ५४ हजार १२९
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uxVxqx
No comments:
Post a Comment