Breaking

Tuesday, May 25, 2021

कलासंपन्न पोलिस झळकणार रिअॅलिटि शो-यूट्युबवर; असा असेल 'म्युझिकल प्रोजेक्ट' https://ift.tt/2StwRC6

कलागुणसंपन्न पोलिसांसाठी 'म्युझिकल प्रोजेक्ट' राबविण्याचा पोलिस दलाचा मानस आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेले पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांना इंडियन आयडॉल, सारेगामा यांसारख्या रिअॅलिटी शो तसेच यूट्युबरवरही कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : पोलिस दलातील वर्दीमध्ये अनेक दर्दी दडलेले आहेत. कुणी गायनात पारंगत आहेत, तर कुणी वादनात. अशाप्रकारे पोलिसांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. अशा पोलिसांचा शोध घेऊन त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा कलागुण जपणाऱ्या पोलिसांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिस दल हे शिस्तीचे दल म्हणून ओळखले जाते. मुंबई पोलिस दलामध्ये अंमलदारापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी आपले छंद जोपासले आहे. काहींना त्यांची आधीपासून आवड होती, तर काहींनी ड्युटीतील ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या अनेक कला आत्मसात केल्या आहेत. शिस्तीच्या दलामुळे या कला सादर करण्यासाठी त्यांना वाव मिळत नाही. म्हणूनच या पोलिसांना व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. अशा पोलिसांसाठी 'म्युझिकल प्रोजेक्ट' राबविण्याचा पोलिस दलाचा मानस आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेले पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांना इंडियन आयडॉल, सारेगामा यांसारख्या रिअॅलिटी शो तसेच यूट्युबरवरही कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. यामुळे त्या पोलिसाबरोबरच मुंबई पोलिसांचे नावही झळकेल. मुंबईत असलेल्या सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच विशेष शाखांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या अधिपत्याखाली असलेल्या आणि कोणतीही कला सादर करण्याची तयारी असलेल्या पोलिसांची माहिती जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही सर्व माहिती तसेच अंगभूत कला असेल, त्याचे रेकॉर्डिंग विभाग कार्यालयास पाठविण्यास सांगण्यात आले आहे. हा उपक्रम सध्या तरी प्रस्तावित असून ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळेल, त्यानुसार त्यास अधिक चालना दिली जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fhGdKh

No comments:

Post a Comment