नवी दिल्ली : टाइम्स समूहाच्या दिवंगत अध्यक्ष यांच्या निधनानंतर १३ व्या दिवशी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, टाइम्स ग्रुपचे अधिकारी, जवळच्या राजकीय व्यक्ती आणि हितचिंतक प्रार्थना सभेसाठी हजर झाले. करोना नियमांमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात भगवद्गीतेच्या श्लोकांनी करण्यात आली. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमातील पुरोहितांनी श्लोकांचं पठण केलं. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अध्यात्माला आयुष्य वाहून घेतलेल्या ज्येष्ठ समाजसेविका, कलेच्या आश्रयदात्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या अशी बहुआयामी ओळख असलेल्या इंदू जैन यांचं यांचं १३ मे रोजी कोव्हिडसंबंधी गुंतागुंतींमुळे निधन झालं होतं. मृत्यूसमयी त्या ८४ वर्षांच्या होत्या. इंदू जैन यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत राजकारण, उद्योग क्षेत्र, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली. विविध पुरस्कारांनी गौरव समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगलेल्या इंदू जैन यांना अनेक मानसन्मानांनी गौरवण्यात आलं होतं. २०१६ साली त्यांना 'पद्मभूषण' सन्मान प्रदान करण्यात आला होता. 'इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया'तर्फे २०१९मध्ये त्यांना 'लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड', 'ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन'तर्फे २०१८ मध्ये माध्यमांमधील योगदानासाठी 'लाइफटाइम अॅचिव्हमेंट अॅवॉर्ड' तसेच 'इंडियन काँग्रेस ऑफ विमेन'तर्फेही 'लाइफटाइम अॅचिव्हमेंट अॅवॉर्ड' असे अनेक सन्मान त्यांना मिळाले होते. २००० मध्ये त्यांनी 'संयुक्त राष्ट्रां'च्या 'मिलेनियम वर्ल्ड पीस समिट'ला संबोधित केलं होतं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34ePbBQ
No comments:
Post a Comment