Breaking

Wednesday, May 26, 2021

अन् एकट्या प्रवाशासह विमान झाले दुबईला रवाना https://ift.tt/2SzMoQT

म. टा. प्रतिनिधी, मुंबई ३६० आसनी विमानांत केवळ एका प्रवाशाला घेऊन विमा आकाशात झेपावले. हा प्रकार एमिराट्स एअरवेजच्या विमानाबाबत घडला. मुंबईतील हा प्रवासी यूएई सरकारचा सुवर्ण व्हिसाधारक आहे. करोनानिर्बंधांमुळे सध्या नियमित उड्डाणे बंद आहेत. निवडक उड्डाणे केंद्र सरकारच्या 'एअर बबल' या योजनेंतर्गत सुरू आहेत. त्यातच मुंबई-दुबईचा समावेश आहे. परंतु यूएई सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांना बंदी आणली आहे. केवळ सुवर्ण व्हिसा असलेले व सरकारी कामानिमित्त येणाऱ्यांनाच तेथील सरकारकडून व्हिसा दिला जात आहे. असा सुवर्ण व्हिसा मुंबईतील उद्योजक यांच्याकडे आहे. त्याद्वारे त्यांनी अलिकडेच मुंबई-दुबई प्रवास केला व तोदेखील एकट्याने. झवेरी हे नियमित प्रवासी आहेत. आतापर्यंत त्यांनी २४० वेळा मुंबई-दुबई असा केला. त्यानंतर अलिकडेच केलेल्या या प्रवासासाठी त्यांनी एक आठवडाआधी तिकीट आरक्षित केले. त्यानंतर प्रवासासाठी विमानात चढताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. विमानाच्या मुख्य वैमानिकाने स्वत: कॉकपिटबाहेर येऊन त्यांचे स्वागत केले. तसेच विमानोड्डाणाआधीच्या सर्व सूचना वैमानिकाने त्यांना प्रत्यक्ष भेटून दिल्या. असे का झाले, असा प्रश्न झवेरी यांच्यासमोर निर्माण झाला. आपल्या आसनावर जाऊन बसताच, त्यांना याचे कारण उमगले. झवेरी हे त्या भल्या मोठ्या विमानातील ते एकमेव प्रवासी होते. एका प्रवासासाठी आठ लाख इंधनखर्च एमिराट्स कंपनीचे ते विमान बोइंग ७७७ हे होते. या विमानाची क्षमता जवळपास ३६० आसने आहे. मुंबई-दुबई या एका प्रवासासाठी किमान आठ लाख रुपयांचा इंधनखर्च या विमानाला येतो. तसे असतानादेखील केवळ एका प्रवाशाला घेऊन हे विमान दुबईला रवाना झाले, हे विशेष.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yEShNt

No comments:

Post a Comment