Breaking

Sunday, May 2, 2021

प्रेमप्रकरणातून जावयाने केला सासूचा खून https://ift.tt/3aWYAS5

म. टा. प्रतिनिधी, प्रेमप्रकरणातून जावयाने सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना बिबवेवाडी येथे शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे. असिफ दस्तगीर आत्तार (वय २६, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत अनारकली महंमद तेरणे (वय ४५, रा. बेळगाव, कर्नाटक) या महिलेचा खून झाला आहे. या प्रकरणी मौलाली मंजलापुरे (वय ३१, रा. मार्केट यार्ड) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, असिफ यांचे काही महिन्यांपूर्वी अनारकली यांच्या मुलीसोबत लग्न झाले होते. त्यानंतर ते एकत्र राहत असताना असिफचे अनारकली यांच्यासोबत प्रेमसंबध निर्माण झाले. त्यामुळे असिफने अल्पवयीन मेव्हणीसह सासूला पुण्यातील बिबवेवाडीत आणले. शेळके वस्तीत भाड्याने घर घेऊन ते पती-पत्नीप्रमाणे राहत होते. आठ महिने संसार केल्यानंतर त्यांच्यात घरगुती कारणावरून भांडणे होऊ लागली. त्यामुळे रागातून शनिवारी सकाळी असिफने अनारकलीचा गळा ओढणीने आवळून खून केला. त्यानंतर असिफ गुलटेकडी परिसरात असून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती हवालदार विश्वनाथ शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुलटेकडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vH9inX

No comments:

Post a Comment