Breaking

Sunday, May 2, 2021

पंढरपूर पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंना अवघी १३७ मते; डिपॉझिटही झाले जप्त https://ift.tt/3eP0i9p

सोलापूर: '' फेम अभिजित बिचुकले यांना पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अवघी १३७ मते मिळाली आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार लाखांवर मतं घेत असताना आमदारकीचे स्वप्न पाहणारे बिचुकलेंना फक्त १३७ मतांवरचं समाधान मानावे लागले आहे. त्यामुळं या निवडणुकीत ते पुन्हा १३७ मतांवर रण आउट झाले आहेत.अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यांचा हा स्कोर वरळी विधानसभा निवडणुकीतल्या मतांपेक्षा कमी आहे. म्हणून या निवडणुकीत त्यांचं पुन्हा एकदा डिपॉझिट जप्त झालं आहे. स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवक ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुले आव्हान दिलं आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघी १५० मतं मिळाली होती. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना एकदाही यश आलेलं नाही. मात्र, तरीही हार न मानता त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. '२०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्यांनी यापूर्वी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पंढरपूरमधून नशीब आजमावताना आपण आमदार झालो तर भाजप-सेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सुतासारखे सरळ करण्याचा अजेंडा जाहीर केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aZJeMW

No comments:

Post a Comment