सेऊल: उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भाषणावर उत्तर कोरिया संतप्त झाला आहे. उत्तर कोरियापासून सुरक्षेला धोका असल्याचे सांगून आणि त्यांच्याविरुद्ध शत्रुत्वाचे धोरण कायम राखण्याचा हेतू अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी नुकत्याच केलेल्या भाषणातून उघड केला आहे. त्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशा इशारा रविवारी उत्तर कोरियाने दिला. बायडन यांनी मागच्या आठवड्यात संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात उत्तर कोरिया आणि इराणच्या अणुकार्यक्रमांमुळे अमेरिका आणि जागतिक सुरक्षेला गंभीर धोका असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर अमेरिका आपल्या मित्रदेशांसह या समस्येचे निराकरण करण्यासाठी कठोर धोरण स्वीकारणार असल्याचे सांगितले होते. वाचा: वाचा: उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी क्वोन जोंग गुन यांनी, ‘त्यांच्या (बायडन) भाषणावरून उत्तर कोरियाविरोधातील शत्रुत्वाचे धोरण कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. हे मागील अर्ध्या शतकापासून अमेरिकेने केले आहे. मात्र, हे असे करणे गंभीर चूक ठरेल’' . वाचा: वाचा: अमेरिकेने उत्तर कोरियासंदर्भात आपले धोरण स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्हीही त्यानुसार आमची कारवाई करू. परिणामी येत्या काळात अमेरिकेला आपण किती मोठी चूक केली आहे, हे समजेल’, असेही ते म्हणाले. उत्तर कोरिया अमेरिकाविरोधात कोणती पावले उचलणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vzZhZA
No comments:
Post a Comment