Breaking

Thursday, May 27, 2021

'यास'चा बंगाल-ओडिशाला जबरदस्त फटका, आज पंतप्रधान मोदींचा दौरा https://ift.tt/3fr4BZT

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : शुक्रवारी आणि या वादळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. यावेळी यास चक्रीवादळामुळे या भागांत झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेतील. भुवनेश्वर येथे मोदी यांची पहिली आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर ते बालासोर, भद्रक आणि पूर्व मिदनापूर या वादळाचा फटका बसलेल्या भागांचे हवाई सर्वेक्षण करतील, असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. यानंतर ते पश्चिम बंगालमध्ये आढावा बैठक घेतील. बुधवारी देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील काही भागांत धडकले. यामध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमध्ये २१ लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ५,००० कोटींचे नुकसान पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळामुळे १५ हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. वादळग्रस्तांसाठी पुढील महिन्यापासून 'दारोदार मदत' या योजनेची घोषणा त्यांनी केली. नुकसानग्रस्त भागासाठी एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणाही त्यांनी केली. झारखंडमध्ये आठ लाख नागरिकांना फटका यास चक्रीवादळाने गुरुवारी झारखंडमध्ये प्रवेश केला. यामध्ये किमान आठ लाख नागरिकांना फटका बसला. यामुळे रांचीसह राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळून जनजीवन विस्कळीत झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुमारे १५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. खारखाई आणि सुवर्णरेखा या नद्यासंह अनेक नद्यांचा जलस्तर धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक असल्याने पूर्व सिंघभूम जिल्ह्यासोबत अन्य ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन सचिव अमिताभ कौशल यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uuS9wL

No comments:

Post a Comment