वृत्तसंस्था, नवी दिल्ली महाराष्ट्रातील येथील जेनेटिक लाइफ सायन्सेस ही कंपनी काळ्या बुरशीवरील 'अॅम्फोटेरेसिन-बी' इंजेक्शनचे उत्पादन करणार आहे. तेथून उत्पादित करण्यात आलेल्या इंजेक्शनची एक कुपी बाराशे रुपयांना उपलब्ध असेल, अशी माहिती केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने 'ट्वीट'द्वारे दिली. सध्या 'अॅम्फोटेरेसिन-बी'ची एक कुपी बाजारात सात हजार रुपयांना विकली जात आहे. 'गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे वर्ध्यातील जेनेटिक लाइफ सायन्सेसने इंजेक्शनचे उत्पादन सुरू केले आहे. सध्या फक्त एकच कंपनी या इंजेक्शनचे उत्पादन करते. वर्ध्यात तयार झालेल्या इंजेक्शनचे वितरण येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. बाराशे रुपयांना एक कुपी या दराने औषध मिळेल,' असे 'ट्वीट' गडकरींच्या कार्यालयाने केले आहे. केंद्र सरकारने बुधवारीच या इंजेक्शनच्या सुमारे २९ हजार अतिरिक्त कुप्यांचे वाटप राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले होते. सध्या महाराष्ट्रासह नऊ राज्यांना हा आजार अधिसूचित केला आहे. देशभरातील रुग्णसंख्या बुधवारी ११ हजारांवर होती. महाराष्ट्रात ३२०० रुग्ण 'राज्यात काळ्या बुरशीचे ३२०० रुग्ण आहेत,' अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. 'या आजारावरील उपचारांसाठी राज्याला दैनंदिन १४ हजार इंजेक्शन कुप्यांची गरज असताना प्रत्यक्षात चार ते पाच हजार कुप्या मिळत आहेत. देशभरात या इंजेक्शचे उत्पादन अत्यंत मर्यादित असल्यानेच तुटवडा आहे,' असेही अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले. कोव्हिडविषयक उपाययोजनांवरील जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्या. अमजद सय्यद आणि न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सरकारने ही माहिती दिली. पुढील सुनावणी दोन जूनला होणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34lJFNQ
No comments:
Post a Comment