मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने ग्राहकांना मेटाकुटीला आणले आहे. महिनाभरात झालेल्या दरवाढीनंतर मुंबईत पहिल्यांदाच पेट्रोलचा भाव १०० रुपयांवर गेला आहे. काल गुरुवारी मुंबईतील उपनगरांमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव १०० रुपयांवर गेला. पेट्रोलची शंभरी गाठणारे मुंबई हे देशातील पहिले मेट्रो शहर ठरले. तर अच्छे दिन येणार या आशेवर बसलेल्या ग्राहकांचे पेट्रोलच्या शंभरीनें डोळे पांढरे केले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर जैसे थेच ठेवला आहे. तर काल गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात २४ पैसे आणि डिझेलमध्ये २९ पैसे वाढ केली होती. या दरवाढीने देशभारत पेट्रोल डिझेल महागले. काल गुरुवारी मुंबईतील उपनगरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली. मुंबईत पेट्रोलचा भाव १००.०४ रुपये झाला तर डिझेल ९१.१७ रुपये झाले. कांदिवलीतील चारकोपमधील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा भाव १००.१२ रुपये प्रती लीटर झाला. तर स्पीड पेट्रोल १०३.०३ रुपये प्रती लीटर आहे.या दरवाढीने पेट्रोलची किंमत १०० रुपये झालेले मुंबई देशातील पहिले मेट्रो शहर बनले आहे. पेट्रोल ११ टक्के तर डिझेल १४ टक्क्यांनी महागले चालू वर्षात मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईत पेट्रोलचा भाव ११ टक्क्यांनी तर डिझेलचा भाव १४ टक्क्यांनी वधारला आहे. तर मे महिन्यात आतापर्यंत कंपन्यांनी १५ वेळा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची सेंच्युरी महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने सेंच्युरी गेली आहे. अमरावतीमध्ये १००.४९ रुपये, औरंगाबादमध्ये १००.९५ रुपये, भंडारा १००.२२ रुपये, बुलढाणा १००.२९ रुपये, गोंदिया १००.९४ रुपये, हिंगोली १००.६९ रुपये, जळगाव १००.८६ रुपये, जालना १००.९८ रुपये, नंदुरबार १००.४५ रुपये, उस्मानाबाद १००.१५ रुपये, रत्नागिरी १००.५३ रुपये, सातारा १००.१२ रुपये, सोलापर १००.१० रुपये, वर्धा १०० रुपये, वाशीम १००.३४ रुपये, ठाणे १०० रुपये आणि मुंबई १००.०४ रुपये झाले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SAxzgW
No comments:
Post a Comment