नवी दिल्ली : आता, २०२१ सालातील जून महिना उजाडलाय. एप्रिल - मे महिन्याच्या सुरुवाताली टीपेला पोहचलेली करोना संक्रमणाची दुसरी लाट आता ओसरताना दिसतेय. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी (३१ मे २०२१) १ लाख २७ हजार ५१० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे २७९५ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ५५ हजार २८७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८१ लाख ७५ हजार ०४४ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ५९ लाख ४७ हजार ६२९ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या १८ लाख ९५ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ३१ हजार ८९५ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ८१ लाख ७५ हजार ०४४
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ५९ लाख ४७ हजार ६२९
- उपचार सुरू : १८ लाख ९५ हजार ५२०
- एकूण मृत्यू : ३ लाख ३१ हजार ८९५
- करोना लसीचे डोस दिले गेले : २१ कोटी ६० लाख ४६ हजार ६३८
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wPyIjw
No comments:
Post a Comment