अमरावती: शहरातील हिंदू स्मशानभूमीत लावण्यात येणाऱ्या गॅस दाहिनीवरून ( in ) शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. गॅस दाहिनीला विरोध करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवारी शिवसैनिक थेट लाठ्याकाठ्या घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. त्यामुळं तणाव निर्माण झाला होता. वाचा: अमरावतीमधील हिंदू स्मशानभूमीत जिल्हा प्रशासनातर्फे उभारण्यात येत आहे. त्यावरून मागील दहा दिवसांपासून राजकारण तापलं आहे. भाजपनं गॅस दाहिनी बसवण्यास विरोध केला आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिकांसह तिथं मूक आंदोलन केलं होतं. त्यानंतर भाजपच्या काही नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी गॅस दाहिनीला विरोध करत आंदोलन केले होते. तसंच, तिथं मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात भाजपची साथ दिली होती. मात्र हा विरोध झुगारून महापालिका व जिल्हा प्रशासनानं गॅस दाहिनी उभारण्याचं काम सुरू केलं होतं. या कामाला विरोध करण्यासाठी कुलकर्णी यांच्यासह भाजपचे काही कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाली. ही माहिती मिळताच शिवसेनेचे शहर प्रमुख पराग गुढदे यांनी शिवसैनिकांसह लाठ्याकाठ्या घेऊन तिथं धाव घेतली. हिंमत असेल तर कुलकर्णी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून दाखवावा. त्यांना लाठ्यांचा प्रसाद देऊ, असा इशारा शिवसेनेचे पराग गुढदे यांनी यावेळी दिला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3c5rKz4
No comments:
Post a Comment