नंदीग्राम: पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठेच्या मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी दोन जुन्या सहकाऱ्यांमध्ये काट्याची टक्कर आहे. एकीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दुसरीकडे तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपत गेलेले सुवेंदू अधिकारी आहेत. ममतांनी सुवेंदूंना आव्हान देण्यासाठी भवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राममध्ये लढल्या. आता मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. सकाळी ९.२७ मिनिटे - पहिल्या फेरीत सुवेंदू १५०० मतांनी आघाडीवर पश्चिम बंगालमधील महत्वाच्या जागांपैकी नंदीग्राममधून भाजपचे सुवेंदू अधिकारी सातत्याने आघाडीवर आहेत. ममता बॅनर्जींना मागे टाकतानाच, सुवेंदू अधिकारी यांनी पहिल्या फेरीत १५०० मतांनी आघाडी घेतली आहे. बंगालच्या सुरुवातीच्या टप्प्यात तृणमूल काँग्रेसने १२५ जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, नंदीग्राममध्ये भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरची जागा सोडून नंदीग्रामची निवड केली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gUqvpR
No comments:
Post a Comment