Breaking

Friday, May 7, 2021

करोनाची दुसरी लाट ओसरण्याचं नाव घेईना, दररोज ४ लाखांहून अधिक रुग्ण https://ift.tt/3hbzinq

नवी दिल्ली : देशाला करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोक्याचा इशारा मिळालेला असला तरी अद्याप दुसरी लाट ओसरताना दिसून येत नाही. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात शुक्रवारी (७ मे २०२१) रेकॉर्डब्रेक ४ लाख ०१ हजार ०७८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ४१८७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख १८ हजार ६०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ३८ हजार २७० नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ७९ लाख ३० हजार ९६० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३७ लाख २३ हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ७९ लाख ३० हजार ९६०
  • उपचार सुरू : ३७ लाख २३ हजार ४४६
  • एकूण मृत्यू : २ लाख ३८ हजार २७०
  • करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी ७७ लाख ४६ हजार ५४४
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १६ कोटी ७७ लाख ४६ हजार ५४४ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २२ लाख ९७ हजार २५७ लसीचे डोस शुक्रवारी देण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2R3q9T9

No comments:

Post a Comment