न्यूयॉर्क: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हा दौरा २८ मे पर्यंत असणार आहे. करोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना भारतात लस तुटवडाही जाणवत आहे. त्यामुळे या दौऱ्यात लशीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. जयशंकर हे अमेरिकन कंपन्यांसोबत करोना लस, लशीसाठीचा कच्चा माल, लशीची संयुक्त निर्मिती आदीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे न्यूयॉर्कमध्ये असून या ठिकाणी संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुतारेस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या दौऱ्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यासोबतही चर्चा होणार आहे. त्याशिवाय अमेरिकन मंत्रिमंडळाच्या सदस्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय संबंधांबाबतही चर्चा करणार आहेत. जो बायडन यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर भारताच्या वरिष्ठ मंत्र्यांचा पहिलाच दौरा आहे. वाचा: वाचा: जयशंकर हे आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात भारतात लशीचे उत्पदन वाढवण्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जोर लावणार असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय संयुक्तपणे लस उत्पादनावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका दरम्यान करोना महासाथीशी निगडित सहकार्याबाबत उद्योजकांसोबतही जयशंकर संवाद साधणार आहेत. भारताकडून करोना प्रतिबंधक लशीचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासह परदेशातूनही लस खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fVqMH1
No comments:
Post a Comment