मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले आहेत. आज सलग १८ व्या दिवशी पेट्रोल आणि स्थिर आहे. मात्र पश्चिम बंगालसह चार राज्यांची निवडणूक पार पडली असून लवकरच कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ७० डॉलरच्या दिशेनं वाटचाल करत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला देशात अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन लागू झाल्याने इंधन मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी तूर्त इंधन दर जैसे थेच ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. आज सोमवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे.दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते. एप्रिल महिन्यात क्रूडचा भाव १० टक्क्यांनी वाढला आहे. आज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या भावात किंचित वाढ झाली आहे . ब्रेंट क्रूडचा भाव ६७.०८ डॉलर झाला. त्यात ०.३२ डॉलरची वाढ झाली. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६३.९१ डॉलर प्रती बॅरल झाला. त्यात ०.३३ डॉलरची वाढ झाली. एप्रिल महिन्यात ब्रेंट क्रूडच्या भावात ८ टक्के वाढ झाली आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १० टक्क्यांनी वधारला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vCw4xb
No comments:
Post a Comment