: घाटकोपरच्या पंतनगर परिसरात एका मंदिरात ७० वर्षीय जैन मुनींनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली. मनोहर लाल मुन्नी महाराज असे त्यांचे नाव असून, याप्रकरणात पंतनगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंतनगर येथील एका मंदिरात मुन्नी महाराज अनेक दिवसांपासून सेवा बजावत होते. गुरुवारी पहाटे ते पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. मंदिर प्रशासनाने माहिती देताच पंतनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली आहे. माझे गुरू माझ्या स्वप्नात आले. तुझे पृथीवरील काम संपले आहे असे त्यांनी सांगितल्याने मी जात असल्याचे या चिट्ठीत नमूद करण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fCq8O7
No comments:
Post a Comment