Breaking

Thursday, May 20, 2021

इस्रायलकडून शस्त्रसंधीला मंजुरी; हमासने केला विजयाचा दावा https://ift.tt/3yDk40O

गाझा: मागील ११ दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेला संघर्ष अखेर शस्त्रसंधीनंतर थांबला आहे. इस्रायलने शस्त्रसंधीला मंजुरी दिल्यानंतर गाझामध्ये लोकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना हमासच्या एका नेत्याने इस्रायलविरोधातील या संघर्षात आपल्याला विजय मिळाला असल्याचा दावा केला आहे. गाझा पट्टीतील इस्लामिक आंदोलनाच्या राजकीय विभागाचे दुसऱ्या क्रमांकावरील नेते खलील अल हया यांनी सांगितले की, हा विजयाचा उत्साह आहे. इस्रायलच्या हल्ल्यात नष्ट झालेली घरे पुन्हा उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर गाझात मशिदीतील लाउडस्पीकरून पॅलेस्टाइनची जमीन बळकावण्याचा इस्रायलचा डाव यशस्वी होऊ दिला गेला नसल्याची म्हटले गेले. जनतेने इस्रायला केलेल्या प्रतिकाराचा विजय झाला असल्याचे नमूद करण्यात आले. इस्रायल-हमासमध्ये शस्त्रसंधी व्हावी यासाठी इजिप्तने केलेल्या मध्यस्थी केली. यामध्ये गाझातील दुसरा मोठा सशस्त्र गट इस्लामिक जिहादलादेखील सहभागी करून घेण्यात आले होते. त्यानंतर हमास आणि इस्रायलने शस्त्रसंधी लागू करण्यावर सहमती दर्शवली. वाचा: २२७ पॅलेस्टिनी ठार गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत ६४ बालके आणि ३८ महिलांसह कमीत कमी २२७ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. तर, १६२० जण जखमी झाले आहेत. हमास आणि इस्लामिक जिहाद या गटांनी आपले २० जण ठार झाले असल्याचे म्हटले आहे. तर, इस्रायलच्या दाव्यनुसार ही संख्या १३० आहे. दोन्ही बाजूने सुरू असलेल्या संघर्षामुळे ५८ हजार पॅलेस्टिनी नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. वाचा: हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये पाच वर्षाचा एक बालक, १६ वर्षीय मुलगी आणि एका जवानासह १२ जण ठार झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात कमीत कमी १८ रुग्णालये आणि दवाखाने नष्ट झाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yvh7Pw

No comments:

Post a Comment