तेल अवीव: मागील आठ दिवसांपासून इस्रायल-पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत नाही. इस्रायलकडून गाझा पट्टीवर हल्ले सुरूच आहेत. हमास वापरत असलेला भुयारी मार्ग आणि हमासच्या कमांडरची घरे उद्धवस्त केली असल्याचा दावा इस्रालयने केला आहे. तर, दुसरीकडे दोन देशांमधील संघर्षाचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणावर उमटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझामधील हमास संचलित धार्मिक मंत्रालयाची पाच मजली इमारत उद्धवस्त झाली. हमासच्या अंतर्गत सुरक्षा दलाचे कामकाज या इमारतीमधून सुरू होते, असा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे. त्याशिवाय गाझामधील एक जिहादी इस्लामिक नेताही या हल्ल्यात ठार झाला असल्याचे इस्रायलने म्हटले असल्याचे वृत्त 'एपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे. गाझामधील १५ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग उद्धवस्त केला असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. वाचा: गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याभरात इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात २१२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये ६१ बालके आणि ३६ महिलांचा समावेश आहे. तर, १४०० हून अधिकजण जखमी झाले आहेत. तर, गाझामधून हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलमध्ये १० जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका पाच वर्षाचा बालक आणि एका इस्रायली जवानाचा समावेश आहे. वाचा: दरम्यान, इस्रायलमध्ये ज्यू आणि अरब समुदायात हिंसाचाराच्या घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. सोमवारी एका गटाने ज्यू व्यक्तीवर हल्ला केला असल्याची घटना समोर आली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायली नागरिकांच्या सुरक्षितेसाठी गाझावर हल्ले सुरूच राहणार असल्याचे म्हटले. इस्रायलच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करत होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ykeCQ7
No comments:
Post a Comment