Breaking

Wednesday, May 19, 2021

'आम्ही हतबल होतो'; मुंबई हाय दुर्घटनेत वाचलेल्यांच्या भावना https://ift.tt/3u0Vl2H

म. टा. प्रतिनिधी, ''जवळील बार्ज अपघातासंबंधी अॅफकॉन्स कंपनीचाच निर्णय चुकला, अशा भावना या दुर्घटनेत वाचलेल्यांनी व्यक्त केल्या. वाचलेले कर्मचारी बुधवारी नौदलाच्या युद्धनौकेने मुंबईत पोहोचले. त्यावेळी त्यांनी हे मत मांडले. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या हिरा इंधन विहीर परिसरात ही घटना घडली, तेथे एकूण तीन बार्ज कार्यरत होते. या विहिरी व ही जागा तेल व नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ओएनजीसीच्या असल्या तरी बार्ज हे अॅफकॉन्स लिमिटेडकडून चालवले जात होते. बार्जचे संपूर्ण व्यवस्थापन अॅफकॉन्स लिमिटेड या कंपनीकडेच होते. चक्रीवादळाचा इशारा आल्यानंतर दोन बार्ज मुंबईच्या किनाऱ्याकडे रवाना करण्यात आले. पण या तिसऱ्या बार्जला मात्र तेथेच थांबण्यास सांगण्यात आले. त्याचे कारण मात्र कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले नाही. हा निर्णय चुकला आणि पुढे भीषण असा अपघात घडला. काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, 'आम्ही बार्जच्या कॅप्टनला रविवारी सकाळीच हलण्याबाबत विचारले. पण कॅप्टनने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यानंतर सोमवारी दुपारी भीषण घटना घडली. आम्ही लहान कर्मचारी आहोत. वरिष्ठ पातळीवरील अधिकारीच निर्णय घेत असतात. आम्ही हतबल होतो.' अॅफकॉन्सचा प्रतिसाद नाही या बार्जलादेखील किनाऱ्याकडे रवाना का करण्यात आले नाही, या प्रश्नासह अन्य काही चौकशीचा ई-मेल 'महाराष्ट्र टाइम्स'ने अॅफकॉन्स लिमिटेड यांना पाठवला. पण त्याला त्यांनी कुठलेही उत्तर किंवा प्रतिसाद आला नाही. याचप्रमाणे केंद्र सरकारच्या ओएनजीसीलाही ई-मेलद्वारे प्रश्न विचारण्यात आले. पण त्यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/340L9wS

No comments:

Post a Comment