गाझा/रामल्लाह: इस्रायलकडून गाझापट्टीवर सुरू असलेल्या हल्ल्याविरोधात पॅलेस्टाइनच्या नागरिकांनी मंगळवारी संप पुकारला. या संपात पॅलेस्टाइनसह इस्रायल आणि इस्रालयने ताब्यात घेतलेल्या प्रदेशातील पॅलेस्टिनी नागरिकांनी सहभाग घेतला. दरम्यान, इस्रायलने गाझा शहरातील इमारतींवर हवाई हल्ला सुरूच ठेवला असून गाझातूनही हमासने रॉकेट हल्ला केला. हमासच्या रॉकेट हल्ल्यात दोन जण ठार झाल्याचे वृत्त 'एपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे. मागील आठ दिवसांपासून इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष पेटला आहे. इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्याविरोधात आणि पॅलेस्टाइनचा बळकावलेल्या भूभागाचा ताबा सोडावा या मागणीसाठी पॅलेस्टिनींनी संप पुकारला. इस्रायलमध्ये २० टक्क्यांहून अधिक नागरीक आहेत. जेरुसलेमसह अनेक ठिकाणी शांततेत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी दुकाने बंद होती. मात्र, काही ठिकाणी हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. रामल्लाहमध्ये रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. तर, वेस्ट बँक भागातील इस्रायली चेक पॉईंटवर इस्रायली सैनिकांसोबत झटापट झाली. या संपात पॅलेस्टाइनमधील अनेक गट एकत्र आले होते. हमासनेही या संपाला पाठिंबा दिला होता. अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. संपामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. वाचा: वाचा: अल अक्सा मशिदीच्या मुद्यावरून इस्रायली सुरक्षा दल आणि पॅलेस्टाइनच्या नागरिकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर दोन्ही बाजूने संघर्ष चिघळला. इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीतील हमासकडून मोठ्या हल्ले-प्रतिहल्ले सुरू झाले. मागील आठ दिवसांत हमासच्या हल्ल्यात एका लहान मुलासह १० इस्रायलींचा मृत्यू झाला. तर, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात २०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3u4nA0p
No comments:
Post a Comment