Breaking

Monday, May 24, 2021

दिलासादायक! पुणे शहरातील सक्रिय रुग्ण दहा हजारांखाली https://ift.tt/3udsskd

म. टा. प्रतिनिधी, गेल्या महिन्यात सक्रिय रुग्णसंख्येचा ५६ हजारांचा उच्चांक गाठल्यानंतर या महिन्यात दुसऱ्या लाटेचा प्रभाव वेगाने ओसरतो आहे. सोमवारी शहरातील सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा १० हजारांच्या खाली घसरला आहे. शहरात ८४ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेपेक्षा कमी नोंदवली गेली. जिल्ह्यात दिवसभरात दोन हजार २० रुग्णांची वाढ झाली; पण त्यापेक्षा तिप्पट सहा हजार ६४७ रुग्ण करोनातून मुक्त झाले. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वांत मोठा फटका पुण्याला बसल्याने एप्रिलमध्ये शहरात सर्वाधिक रुग्णवाढ झाली. सक्रिय रुग्णसंख्या १८ एप्रिलला ५६ हजारांच्या पुढे गेली होती. त्याच वेळी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या एक लाखांच्या पुढे पोहोचली होती. सरकारने घातलेले कडक निर्बंध आणि नागरिकांनी दाखविलेला संयम व शिस्तीमुळे एप्रिल अखेरीपासून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले. आता सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्याने उतरणीला लागली आहे. गेल्या महिन्यात सक्रिय रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर महिन्याभरात त्यात तब्बल ४६ हजारांची घट झाली. सोमवारी शहरात ९ हजार ७२४ एवढे सक्रिय रुग्ण राहिले. पिंपरीत सहा हजार २३९ तर ग्रामीण भागात २५ हजार ७८३ असे जिल्ह्यात एकत्रित ४१ हजार ७४६ सक्रिय रुग्ण सध्या आहेत. गेल्या काही दिवसांत तर शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारांपेक्षा कमी आहे. सोमवारी त्यात आणखी घट झाली आणि दिवसभरात नव्याने ४९४ रुग्णांना लागण झाली. एक मार्चला शहरात ४०६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर थेट ८४ दिवसांनीच रुग्णसंख्येचा आलेख पाचशेच्या खाली उतरला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही रुग्णसंख्या कमी होत असून सोमवारी पिंपरीत ४२३ रुग्णांची वाढ झाली; तर ६२६ नागरिक करोनामुक्त झाले. गेल्या चोवीस तासात पुण्यात ३६, पिंपरी चिंचवडमध्ये २४ आणि ग्रामीण भागात १९ अशा ७९ रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची नोंद झाली. पुण्यातील सोमवारची स्थिती नवीन रुग्ण : ४९४ बरे झालेले रुग्ण : १४१० दिवसभरात मृत्यू : ३६ पिंपरी-चिंचवडची स्थिती नवीन रुग्ण : ४२३ बरे झालेले रुग्ण : ६२६ दिवसभरात मृत्यू : २४


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SsSIJS

No comments:

Post a Comment