मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. एकिकडे सध्या कंगना मनाली येथील तिच्या घरी राहून कुटुंबीयांसोबत वेळ व्यतित करताना दिसत आहे. तर दुसरीकडे तिचा बॉडीगार्ड याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगना रणौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडेच्या विरोधा एका ३० वर्षीय मेकअप आर्टिस्ट तरुणीनं तक्रार दाखल केली आहे. कुमारनं लग्नाचा आश्वासन देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीनं केला आहे. या तरुणीच्या तक्रारीनुसार ती मागच्या वर्षी जून महिन्यात एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कुमार हेगडेला भेटली होती. पीडित तरुणीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, कुमार हेगडेनं तिला लग्नासाठी विचारणा केली होती. त्यानंतर कुमारनं तिला लिव्ह इन रिलेशनशिपसाठी विचारलं होतं आणि तिनं त्याला होकारही दिला होता कारण तिला कुमार तिच्याशी लग्न करेल असा विश्वास वाटत होता. आपल्या तक्रारीत या तरुणीनं म्हटलं आहे की, तिनं कुमारसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. पण त्यानं तिला असं करण्यास भाग पाडलं. एवढंच नाही तर आईची तब्येत ठीक नसल्यानं आपल्याला गावी जायचं आहे असं कारण देत या तरुणीकडून कुमारनं ५० हजार रुपये उधार घेतले होते आणि त्यानंतर कुमारनं तिच्याशी संपर्क तोडला असल्याचं या तरुणीचं म्हणणं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vbPs4k
No comments:
Post a Comment