मुंबई- लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री तिच्या बोल्ड अदांसाठी आणि सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अँजेलिना प्रत्येक वेळी हटके फोटोशूट करून चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. तिचे फोटो पाहून चाहतेही अँजेलिनाचं कौतुक केल्यावाचून राहू शकत नाहीत. प्रत्येक वेळेस अनोख्या पद्धतीचे फोटो काढून चाहत्यांना चकित करणाऱ्या अँजेलिनाने यावेळेस मात्र चाहत्यांना चक्रावून टाकलं आहे. यावेळेस अँजेलिनाने धाडस करत चक्क मधुमाशांमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत. अँजेलिनाने हे फोटोशूट आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस साजरा करण्यासाठी केलं आहे. या दिवसाचं औचित्य साधून अँजेलिनाने जवळपास एक हजार मधमाशांमध्ये फोटोशूट केलं आहे. वायरल झालेल्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कित्येक मधमाशा अँजेलिनाच्या कपड्यांवर आहेत. तिचा गळा, खांदे आणि तोंडावरही मधमाशा पाहायला मिळत आहेत. फोटोमध्ये अँजेलिनाने एक ऑफ शोल्डर ब्लॉउज परिधान केला आहे. या मधमाशा डैन विन्टर्स यांच्या पाळीव मधमाशा आहेत. हे फोटोशूट नॅशनल जिओग्राफिकच्या सौजन्याने केलं गेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास १८ मिनिटं मधमाशा अँजेलिनाच्या अंगावर होत्या. डैन विन्टर्स यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मधमाशा शांत राहाव्यात आणि त्यांनी अँजेलिनाला कोणत्याही प्रकारची हानी करू नये, यासाठी विशेष लक्ष दिलं गेलं होतं. सावधानता म्हणून अनेक गोष्टीचं आयोजन आधीपासूनच करून ठेवण्यात आलं होतं. प्रचंड काळजी घेत हे फोटोशूट पूर्ण केलं गेलं.अँजेलिनाच्या या धाडसाचं काही चाहते कौतुक करत आहेत तर काही तिची थट्टा उडवत आहेत. परंतु, आतापर्यंत क्वचितच एखाद्या अभिनेत्रीने असं काही करण्याचं धाडस केलं असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ucHgiV
No comments:
Post a Comment