मुंबई- टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ' सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. कार्यक्रमात दाखवण्यात येणाऱ्या खोट्या गोष्टींमुळे प्रेक्षक कार्यक्रमावर टीका करत आहेत. कार्यक्रमाची टीआरपी वाढवण्यासाठी निर्मात्यांकडून हे प्रयत्न केले जात असल्याचं म्हटलं जात आहे. सुरुवातीला कार्यक्रमात स्पर्धक सायली कांबळेच्या घरची परिस्थिती गरीब असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर कार्यक्रमातील स्पर्धक पवनदीप आणि अरुणिता यांमध्ये प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं. आता हे सगळं नाटक असल्याचं स्पष्ट झालं आहे. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक याने स्वतः ही कबुली दिली आहे. प्रेक्षकांना आवडतं म्हणून दाखवतो एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना आदित्यने सत्य सांगत म्हटलं, 'आम्ही मस्ती करतो. लोक म्हणतात की आम्ही जाणून बुजून अशी प्रेम कहाणी वगरे दाखवतो. हो आम्ही दाखवतो. ते सगळं नाटक आहे. ढोंग आहे. पण तुम्ही ते मन लावून पाहत नाही? तुम्हाला हे सगळं पाहायला आवडत नाही? प्रेक्षकांना हे पाहायला आवडतं म्हणून आम्ही दाखवतो. ही फक्त एक स्ट्रॅटेजी आहे जी ९० मिनिटं प्रेक्षकांना कार्यक्रमात बांधून ठेवते. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला हे सगळं करावं लागतं. पवनदीप आणि अरुणिता चांगले मित्र आहेत. त्यांच्यात असं काहीही नाही.' पवनदीप- अरुणिता त्यांचे निर्णय स्वतः घेऊ शकतात जेव्हा प्रेक्षक अशा प्रकारांमुळे नाराज असल्याबद्दल सांगितलं तेव्हा आदित्य म्हणाला, 'ठीक आहे पण पवनदीप आणि अरुणिता तरुण आहेत. त्यांचं आयुष्य आहे. त्यांना जे करायचं आहे ते करतील. आम्ही फक्त आनंद घेतोय. तुम्हीही अशा गोष्टी जास्त गंभीरपणे घेऊ नका. सगळ्यांना माहीत आहे की कार्यक्रमात नेहमीच थट्टा मस्करी केली जाते. याचा अर्थ कार्यक्रमाचं नाव खराब करणं असा नाही होत तर प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा त्यामागचा हेतू असतो. आम्ही फक्त प्रेक्षकांसाठी कार्यक्रमाला मजेशीर बनवतो.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hJy1nE
No comments:
Post a Comment