Breaking

Saturday, May 1, 2021

LIVE विधानसभा निवडणूक निकाल : पाच राज्यांत मतमोजणीला सुरुवात https://ift.tt/2PEu5sK

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये मतदारांनी कुणाला कौल दिलाय, हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८.०० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत झालेल्या मतदानामुळे इतर राज्यांपेक्षा या राज्यात निकाल जाहीर होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांपैंकी २९२ जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर दोन ठिकाणी मतदान रद्द करण्यात आलं होतं. या ठिकाणी फेरनिवडणूक घेण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या पक्षांना बहुमत मिळवण्यासाठी १४८ चा आकडा पार करावा लागणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची सगळी तयारी पूर्ण झालीय. LIVE अपडेट :
  • आसाम : आसाम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दोन दिब्रुगडच्या दोन ठिकाणांवर पार पडणार आहे. दिब्रुगड शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय व उपायुक्त कार्यालय इथे ही मतमोजणी होतेय.
  • पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुच्चेरी आणि तामिळनाडूमध्ये सकाळी ८.०० वाजता मतमोजणीला सुरुवात
  • केरळ : कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी पुथुपल्ली चर्चमध्ये प्रार्थना केली. ओमान चंडी हे पुथुपल्ली विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आहेत.
  • तामिळनाडू : तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक
  • केरळ : केरळ विधानसभेत एकूण १४० जागा आहेत. बहुमतासाठी ७१ जागा आवश्यक
  • आसाम : आसाम विधानसभेत एकूण १२६ जागा आहेत. बहुमतासाठी ६४ जागा आवश्यक
  • पुदुच्चेरी : पुदुच्चेरीत एकूण ३० जागांवर मतदान पार पडलंय. (तसंच तीन नामित सदस्य) आहेत. पुदुच्चेरीत बहुमतासाठी १७ जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xQ1Dpg

No comments:

Post a Comment