Breaking

Tuesday, June 29, 2021

पुण्याला दिलासा; शहरांतील करोना रुग्णसंख्येत मोठी घट https://ift.tt/2SEKPlk

पुणे: शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक असल्याचे आढळले. जिल्ह्यात दिवसभरात ९४६ नवीन बाधितांची भर पडली तर १,०६५ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. ( ) वाचा: पुणे शहरात २३२, मध्ये २७५ आणि ग्रामीण भागात ५५८ रुग्ण असे १,०६५ रुग्ण करोनाच्या आजारातून मंगळवारी बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख २२ हजार ४३९ रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात मंगळवारी ५,३६२ एवढ्या चाचण्या झाल्या असून, त्यापैकी २६८ रुग्ण करोना बाधित आढळले. पिंपरीत २१८ आणि ग्रामीण भागात ४६० बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण १० लाख ४९ हजारांहून अधिक जणांना आतापर्यंत झाला आहे. वाचा: शहरात काही दिवसांपासून दोनशे ते अडीचशे दरम्यान रुग्णसंख्या आढळत आहे. त्यामुळे पुन्हा घटत असून साडेनऊ हजाराच्या जवळपास ही संख्या राहत आहे. पिंपरीत ११३० तर ग्रामीण भागात ५८६८ सक्रिय रुग्ण असून, जिल्ह्यात एकूण ९,३२६ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत पुण्यात पाच, पिंपरीत चार आणि ग्रामीण भागात ११ अशा २० रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या ही १७ हजार ८८९ एवढी झाली आहे. वाचा: पुण्यातील मंगळवारची स्थिती नवीन रुग्ण : २६८ बरे झालेले रुग्ण : २३२ दिवसभरात मृत्यू : ५ पिंपरी-चिंचवडची स्थिती नवीन रुग्ण : २१८ बरे झालेले रुग्ण : २७५ दिवसभरात मृत्यू : ४ वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3y7OgzQ

No comments:

Post a Comment