नवी दिल्ली : युरो चषक फुटबल स्पर्धेत काल फ्रान्सच्या रुपात सर्वांनाच जोरदार धक्का बसला होता. पण आजही या स्पर्धेत इंग्लंडने बलाढ्य संघाला चारी मुंड्या चीत करत चाहत्यांना जोरदार धक्का दिला आहे. कारण इंग्लंडने या सामन्यात जर्मनीसारख्या दिग्गज संघाला २-० असे पराभूत करण्याची किमया साधली. या सामन्यातील पहिल्या सत्रात इंग्लंड आणि जर्मनी या दोन्ही संघांकडून जोरदार आक्रमणे पाहायला मिळाली. पण पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, त्यामुळे मध्यंतराच्यावेळी हा सामना ०-० अशी बरोबरीत होता. दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा दोन्ही संघांनी दमदार खेळ केला. पण यावेळी यश मिळाले ते इंग्लंडला. कारण दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा खेळ चांगलाच बहरल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने यावेळी अखेरच्या काही मिनिटांमध्ये दोन गोल करत सामन्यावर वर्चस्व मिळवल्याचे पाहायला मिळाले. सामन्याच्या ७५व्या मिनिटाला रहीम केनने इंग्लंडसाठी पहिला गोल केला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंड जर्मनीनेही बरोबरी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण त्यांना यावेळी अपयश आले. पण इंग्लंडचा संघ यावेळी एका गोलवर थांबला नाही. सामन्याच्या ८६ व्या मिनिटाला हेरी केनने गोल केला आणि इंग्लंडची आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर इंग्लंडने आपला बचाव अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून जर्मनीच्या संघाने सामन्यात पुनरागमन करु नये. इंग्लंडच्या प्रयत्नांना यावेळी चांगले यश मिळाले. कारण त्यानंतर जर्मनीच्या संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे इंग्लंडने जर्मनीवर २-० असा दमदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. हा सामना चांगला रंजकदार होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. त्याचबरोबर सामना सुरु होण्यापूर्वी जर्मनीचे पारडे जड असल्याचे म्हटले जात होते. पण इंग्लंडने यावेळी कोणतेही दडपण टन घेता चांगला खेळ केला आणि जर्मनीला त्यांनी नामोहरम केले. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरीत खेळताना इंग्लंडचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jpuNqe
No comments:
Post a Comment