Breaking

Thursday, June 3, 2021

'राहुल गांधींचा आभारी आहे, पीडीसोबत बैठक झाली नसती तर मी मुख्यमंत्री झालो नसतो' https://ift.tt/34LG2kk

गुवाहाटीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आसामचे मुख्यमंत्री हिंमत सरमा ( ) हे चर्चेत आले आहेत. सरमा यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधी ( ) यांचे आभार मानले आहेत. आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यात राहुल गांधींचे योगदान आहे, असं सरमा याचं म्हणणं आहे. काँग्रेसमध्ये असताना सरमा यांची राहुल गांधींसोबत झालेल्या एक बैठकीचा उल्लेख सरमा यांनी केला आहे. राहुल गांधींना नेत्यांशी बोलण्याऐवजी आपल्या पाळीव कुत्र्यांसोबत खेळणं अधिक पसंत आहे, असं दावा सरमा यांनी केला. हिमंत सरमा हे भाजपमध्ये येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीचा उल्लेख सरमा यांनी केला. त्यावेळी आसाममधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक बैठक झाली होती. या बैठकीत भाजपचा पराभव करण्यावर चर्चा झाली. या बैठीक सरमा आणि राहुल गांधी यांच्याशिवाय पक्षाचे काही प्रमुख नेतेही उपस्थित होते. पण राहुल गांधींना या बैठकी कुठलाही रस दिसून आला नाही. ते सतत आपल्या कुत्र्यांसोबत खेळत होते. बैठकीनंतर आपल्याला कळलं की त्या कुत्र्याचं नाव पीडी आहे, असं सरमा यांनी सांगितलं. बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांसाठी चहा-कॉपी मागवण्यात आली. यावेळी राहुल गांधींजवळ बसलेल्या कुत्रा टेबलाजवळ गेला आणि तिथे ठेवलेल्या प्लेटमधील एक बिक्सिट घेऊन खाऊ लागला. यानंतर राहुल गांधी आमच्याकडे बघून हसू लागले. आपल्याला पाहून ते असं का करत आहेत? असा विचार मी करत होतो, असं सरमा यांनी सांगितलं. कुत्र्याने बिस्कीट खाल्लेल्या प्लेटमधून नेत्यांनीही घेतले बिस्कीट कुत्र्याने उष्टी केलेली बिस्कीटाची प्लेट बदलवून राहुल गांधी दुसरी प्लेट मागवतील याची आपण बैठकीत चहाचा कप घेऊन वाट बघत राहिलो. पण असं झालं नाही. त्यावेली तरुण गोगोई आणि सी. पी. जोशी यांच्यासारखे बडे नेते त्याच प्लेटमधून बिस्कीट उचलून खाऊ लागल्याचं आपण बघितलं. आपण नेहमी राहुल गांधींना भेटायला जात नव्हतो. यामुळे ही एक सामान्य बाब असल्याचा आपल्याला अंदाज आला, असं सरमा म्हणाले. राहुल गांधींच्या प्रत्येक बैठकीत असंच काहीसं होत असणार याचा आपल्याला अंदाज आला. अशा व्यक्तीसोबत आणखी काळ काम करू शकत नाही, हे या घटनेनंतर आपण ठरवलं. यामुळे राहुल गांधींचा मी खूप आभारी आहे. मी मुख्यमंत्री होण्यात कुठे ना कुठे त्या घटनेचे मोठे योगदान आहे, असं हिमंत सरमा म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iggZy0

No comments:

Post a Comment