नागपूर: संसर्गाचा प्रकोप कमी होत असताना व रुग्णालयात जेमतेम ३० रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. मात्र त्यांच्यासाठी अख्खे सर्जिकल कॉम्प्लेक्स वेठीला धरले गेले आहे. रुग्ण येथे असल्याने अन्य आजारांचे रुग्ण या इमारतीकडे जायला धजावत नाहीत. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांवरचे उपचार खोळंबले आहेत. याच मुद्द्यावरून गेल्या तीन दिवसांपासून मेयोतील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा टाकत रुग्ण सेवेतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांची अक्षरश: फरफट सुरू आहे. ( ) वाचा: मेयोतील सुरू असलेल्या या संपामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे २०० डॉक्टर कुठल्याही वॉर्डात रुग्णसेवा द्यायला तयार नाहीत. परिणामी करोना वगळता इतर रुग्णांना आल्या पावली परत फिरावे लागत आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांचा लोंढा मेडिकलकडे वळत आहे. या घडामोडीत गुरुवारी अधिष्ठाता यांनी बैठक घेऊन तात्पुरत्या स्वरूपात दोन फ्लोर घ्या, असा पर्याय निवासी डॉक्टरांपुढे ठेवला. मात्र, पुन्हा हे फ्लोर परत करावे लागतील ही अट त्यांच्यासमोर ठेवली. यावरून निवासी डॉक्टरांमध्ये रोष उफाळला आहे. सध्या मेयोत कोविडवर उपचार घेत असलेले केवळ ३० रुग्ण भरती आहेत. असे असताना अख्खे सर्जिकल कॉम्प्लेक्स वेठीस धरले गेल्याने नॉन कोविड रुग्ण या इमारतीत पाय ठेवायलाही धजावत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार खोळंबले आहेत. शिवाय आमचे पदव्युत्तर शिक्षणही धोक्यात आल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. वाचा: संचालक डॉ. लहाने यांनी दिली हमी मेयोत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनानंतरही स्थानिक प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घ्यायला तयार नसल्याने डॉक्टरांमध्ये आधीच संताप आहे. मेयोचे अधिष्ठाता कोणताही मार्ग काढायला तयार नसताना सेंट्रल मार्डने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मार्डच्या राज्य शाखेने या बाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. यांचे लक्ष वेधले. त्यानुसार डॉ. लहाने यांनी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून ऑनलाईन चर्चा करण्याची हमी मार्डला दिली. या चर्चेनंतर सामूहिक रजा आंदोलन मागे घेणार की नाही, हा निर्णय घेतला जाईल, असे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केले. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vOZclt
No comments:
Post a Comment