पुणे: हे आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे बोलत आहेत. मात्र, पवार यांनी मराठा समाजाच्या बाजूने स्पष्टपणे बोलावे, असे सांगतानाच शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. मग त्यावेळी त्यांनी राज्यात आर्थिक निकषावर आरक्षण का दिले नाही?, असा सवाल नेते व राज्यसभा सदस्य यांनी केला आहे. ( ) वाचा: नारायण राणे यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना प्रश्नी भाष्य करत एकप्रकारे शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले व पवार यांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे अशी मागणी केली. मराठा आरक्षणाबाबत भाजप गंभीर असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. 'मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुढील दिशा निश्चित करण्यासाठी भाजपने पाच वकिलांची नेमणूक केली आहे. या विषयात राज्य सरकारलाही आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत', असे राणे यांनी स्पष्ट केले. वाचा: राज्यसभा सदस्य यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेतानाच त्यांनी पुढील दिशा ठरवण्यासाठी समाजातील विभागवार प्रतिनिधींशीही चर्चा केली आहे. आता शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून ते आपली भूमिका जाहीर करणार आहे. 'तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरून घोषित करेन', असे संभाजीराजे यांनी आजच स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी महत्त्वाचे विधान केले. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा सवाल राणे यांनी केला. संभाजीराजे मराठा समाजाबाबत जे काही योग्य काम करतील त्याला पाठिंबा असेल, असेही राणे म्हणाले. वाचा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. याबाबत विचारणा केली असता राणे यांनी पटोले यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पटोले यांची क्षमताच नाही. ते पक्ष वाढवू शकत नाहीत, असे नमूद करताना त्यांनी पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली तर त्यांना ‘वाजवून’ दाखवू, असा इशारा राणे यांनी दिला. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. देशात सर्वाधिक ९६ हजार नागरिकांचे मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत, असेही राणे म्हणाले. लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार होते मात्र, १२ टक्क्यांवरून टेंडर मंजूर झाले नाही, असा आरोपही राणे यांनी केला. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cfoAsM
No comments:
Post a Comment