Breaking

Thursday, June 3, 2021

वादाला फोडणी! बंगालच्या माजी मुख्य सचिवांनी दिले केंद्राच्या नोटीसला उत्तर https://ift.tt/2TueMo3

नवी दिल्लीः पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय ( ) यांनी अखेर केंद्र सरकारने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला गुरुवारी उत्तर दिले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती ( ) दिली. पंतप्रधान मोदींनी यास चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत गैरहजर राहिल्यावरून केंद्र सरकारने ही नोटीस बजावली होती. या नोटीसला अलपन बंडोपाध्याय यांनी उत्तर दिलं आहे. आपण मुख्यमंत्र्यांच्या ( ) निर्देशाचे पालन केले, असं बंडोपाध्याय यांनी उत्तरात नमुद केलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जे निर्देश दिले, आपण त्या निर्देशाचे पालन केले, असं अलपन बंडोपाध्याय यांनी नोटीसला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. २८ मे रोजी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या उत्तर आणि दक्षिण २४ परगना जिल्ह्यांची हवाई पाहणी करत होतो. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाने आपण दिघा येथे गेलो होतो, असं उत्तर पंतप्रधान मोदींच्या बैठकीत गैरहजर राहिलेल्या अलपन बंडोपाध्याय यांनी दिलं आहे. यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी २८ मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान मोदींनी चक्रीवादळाने पश्चिम बंगालमधील नुकसानीची हवाई पाहणी केल्यानंतर कलाईकुंडा येथे दुपारी २ वाजता आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनाही बोलावण्यात आलं होतं. पण या बैठीकाल ममता बॅनर्जी आणि तत्कालीन मुख्य सचिव असलेले अलपन बंडोपाध्याय हे आर्धा तास उशिराने आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींना अहवाल देत ममता बॅनर्जी या मुख्य सचिवांसह तिथून निघून गेल्या. ममतांच्या या असभ्य वर्तनावर केंद्र सरकराने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच मुख्य सचिव असलेल्या बंडोपाध्याय यांची आदेश काढत केंद्र प्रतिनियुक्ती केली. ३१ मे रोजी दिल्लीत हजर होण्यास सांगितलं. पण ममता बॅनर्जी यांनी बंडोपाध्याय यांना केंद्र पाठवण्यास नकार दिला. यानंतर बंडोपाध्याय यांनी मुख्य सचिवपदाचा राजीनामा दिला. यानंतर ममतांनी बंडोपाध्याय यांची ३ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली. यावरून केंद्र सरकारने बंडोपाध्याय यांना आपत्ती व्यवस्थान कायद्याच्या कलम ५१-ब नुसार नोटीस बजावली. तीन दिवसांत नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं होतं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uLPkr1

No comments:

Post a Comment