नवी दिल्लीः संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने () अग्नी मालिकेतील नवीन क्षेपणास्त्र अग्नी प्राइमची ( ) यशस्वी चाचणी घेतली. सोमवारी सकाळी १०.५५ ला ओडिशाच्या किनाऱ्याजवळील डॉ. अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र सर्व मापकांवर अचूक ठरलं आहे. हे क्षेपणास्त्र १००० ते २००० किलोमीटरपर्यंत अचूक मारा करू शकते. एवढचं नव्हे तर अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे, अशी माहिती डीआरडीओच्या एका सूत्राने दिली. हे क्षेपणास्त्र अग्नी- १ क्षेपणास्त्राची आधुनिक आवृत्ती आहे. ओडिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून सकाळी १०.५५ मिनिटांनी मोबाइल लाँचरवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. अत्याधुनिक ट्रॅकिंग रडारद्वारे क्षेपणास्त्राच्या मार्गावर देखरेख ठेवण्यात आली होती. अण्वस्त्रवाहू असलेल्या या क्षेपणास्त्राची डिजाईन आणि त्याचा विकास डीआरडीओने केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3x2Qa4P
No comments:
Post a Comment