Breaking

Wednesday, June 30, 2021

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या गजा बैलाचे निधन; तब्बल एक टन इतके होते वजन https://ift.tt/3drykAL

सांगलीः मिरज तालुक्यातील कसबे डीग्रज मधील कृष्णा साईमते यांच्या मालकीच्या गजा बैलाचे निधन झाले. गजा बैलाचे वय १० वर्ष ६ महिने होते. काही दिवसांपासून तो आजारी होता. मात्र हृदयविकाराचा झटक्याने त्याचे निधन झाले. गजा बैलाच्या निधनानं मागील दहा वर्षांपासूनचं कृष्णा साइमते आणि यांचं नात आज तुटलं. जीवापाड जपलेल्या लाडक्या गजाचे निधनानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपला लाडका गजा जग सोडून गेल्याने साईमते कुटुंबाना मोठा धक्का बसलाय. या कुटुंबाने त्याच्यावर जीवापाड प्रेम केले होते. गजाचा मालक कृष्णा साईमते तर धाय मोकलून रडतोय, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. गजा बैलाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे वजन तब्बल एक टन एवढे होते, सहा फूट उंची आणि दहा फूट लांबी असा या बैलाचा आकार होता. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये स्थान मिळवलेल्या गजा बैलाची काही दिवसांपूर्वीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. मात्र, साईमते कुटुंबाचा तो आनंद फार काळ टिकला नाही. वयोमानानुसार गजा बैलाचं निधन झाल्यानं तो आनंद साजरा करण्याची संधी साईमते कुटुंबाला मिळालीच नाही. महाराष्ट्रसह कर्नाटकात अनेक कृषी प्रदर्शनांमध्ये तिकीट खरेदी करून लोकं या बैलाला पहायला येत असत. अनेक कृषी प्रदर्शनामध्ये गजा बैल हा खास आकर्षण ठरला होता. या बैलाची ख्याती सर्वदूर पसरली होती. या बैलामुळं त्याच्या मालकाला भरघोस कमाईदेखील झाली होती. कृष्णा साईमतेही गजाची देखभाल उत्तम करत होता. दररोज गाजराचं एक पोतं गजा फस्त करत होता. तसंच, या बैलाला दुधाचीदेखील आवड होती. इतकंच नव्हे तर आपल्या लाडक्या गजासाठी गोठ्यात पंख्याची सोय करणारा हा बहुधा पहिलाच शेतकरी असेल. आपल्या लाडक्या दोस्ताच्या आठवणी कायमस्वरुपी राहाव्यात म्हणून कृष्णा साईमते यांनी गजाच्या शरीराचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. गजाच्या शरीराचे स्लेलेटन करुन त्याच्या हाडाचा सापळा ठेवला जाणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dwrmdw

No comments:

Post a Comment