Breaking

Thursday, June 3, 2021

बदलापुरात वायुगळती; नागरिकांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास https://ift.tt/3fKT9IO

बदलापूर: एमआयडीसी भागात झाल्याने शिरगाव आपटेवाडी या परिसरात ३ किमीच्या परिघात लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. वायुगळतीमुळे काहींना उलट्या आणि खोकल्याचा त्रास देखील जाणवू लागला. मात्र ही वायुगळती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. ही घटना सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली. ( in badlapur people suffer from breathing problem and vomiting) एमआयडीसी भागातील नोबेल इंटरमीडिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून ओव्हरहीटमुळे ही वायूगळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. वायुगळतीमुळे या भागात हवेत वायू पसरला होता. यासंबंधीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी संबंधित परिसराची पाहणी केली. क्लिक करा आणि वाचा- 'परिस्थिती नियंत्रणात, घाबरण्याचे कारण नाही' या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये एका रिॲक्टरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि बेंझाईन डिहायड्रेड या दोन केमिकल्स मिश्रण सुरू होतं. मात्र त्यासाठी लागणारा तापमान नियंत्रित करताना चूक झाल्याने या रिॲक्टरमधून वायुगळती झाली. मात्र हा वायू ज्वलनशील नाही. असे असले तरी हा वायू श्वास घेण्यास त्रासदायक ठरणारा असून त्वचा, डोळे,यांना काही प्रमाणात बाधा करणारा आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे बदलापूर अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uLROFR

No comments:

Post a Comment