नागपूर: विषाणूच्या जोखडातून सुटका होत असल्याच्या सुस्कारा टाकणाऱ्या नागपुरसाठी शुक्रवारचा दिवस आणखी एक समाधान देऊन गेला. संसर्गातून बरे झालेल्यांना काळ्या बुरशीचे संक्रमण गेल्या महिन्याभरामध्ये विभागात झपाट्याने वाढले होते. सोबतच , वर्धा आणि गोंदिया-भंडारातही याचे रुग्ण आढळत आहेत. सुदैवाने शुक्रवारी या बुरशीच्या संक्रमणाचाही वेग संथ झाला. विभागात दिवसभरात नव्याने २८ जणांना या ब्लॅक फंगसचे निदान करण्यात आले तर २ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. ( ) वाचा: आजाराचा विळखा पडलेल्या १४४१ पैकी सर्वाधिक १२१० रुग्ण एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल वर्धेत ९१, चंद्रपुरात ८६, गोंदियात ४१ तर भंडारात १३ जणांना या बुरशीच्या संक्रमणाचे आतापर्यंत निदान करण्यात आले आहे. शुक्रवारी नव्याने म्युकरचे संक्रमण झालेल्यांपैकी १७ नवे रुग्णही नागपुरातील आहेत. नागपूर सोबतच चंद्रपुरात ५ तर वर्धा आणि गोंदियात प्रत्येकी ३ अशा ११ नव्या म्युकरग्रस्तांची नोंद झाली आहे. या बुरशीचे संक्रमण झाल्यानंतर विभागात आजवर १०१५ जणांवर विविध शल्यक्रिया करून उपचार केले गेले आहेत. त्यातील ६३४ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कोविड सोबतच या रुग्णांनी आता म्युकरवरही मात केली आहे. वाचा: म्युकरमृत्यूतही नागपूर आघाडीवर करोनावर मात करताना स्टिरॉईडचे प्रमाण सहन न झाल्याने गेल्या दीड महिन्यात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा विळखा विभागात झपाट्याने वाढला. या बुरशीची लागण झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आजवर विभागात १२० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या मृत्यूतही दुर्दैवाने नागपूर जिल्हा आघाडीवर आहे. म्युकरचे संक्रमण होऊन मरण पावलेल्यांपैकी १११ जण नागपूर जिल्ह्यातील. एकूण मृत्यूपैकी ही सरासरी जवळजवळ ९३ टक्के आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fUgnwq
No comments:
Post a Comment