Breaking

Monday, June 28, 2021

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून दिशाभूल; कोर्टाने वकिलांना खडसावले https://ift.tt/3hf6Mj1

नागपूर: मुंबईत १९९६ मध्ये झालेल्या मालिकेत दोषी आढळल्यानंतर शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांना (अभिवचन रजा) मागताना न्यायालयाची दिशाभूल केल्याची बाब निदर्शास आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वकिलांना सोमवारी कडक शब्दांत खडसावले. सोबतच खंडपीठाने दोन्ही कैद्यांचा फर्लो अर्जही नामंजूर केला. ( ) वाचा: मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेले व या दोन कैद्यांनी हा फर्लो अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाली असता खंडपीठाने हा अर्ज फेटाळून लावला. करोना संक्रमणामुळे सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व सुधारित फर्लो नियमानुसार आपत्कालीन फर्लो देण्यात यावा, अशी विनंतीया दोन कैद्यांनी खंडपीठाकडे केली होती. यापूर्वी न्यायालयाने दोन वेळा दिलेल्या फर्लो दरम्यान अर्जदार दिलेल्या तारखेत कारागृहासमक्ष हजर झाले होते. त्यानुसार, या फर्लोसाठी ते पात्र असल्याचे या कैद्यांचे म्हणणे होते. वाचा: राज्य शासनाने त्यावर दाखल केलेल्या उत्तरानुसार २०११ मध्ये असगर कादर शेख हा एक दिवस उशिरा, तर २०१० मध्ये याकूब नागुल ११ दिवस उशिरा हजर झाला होता. त्यामुळे अर्जदारांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास येताच न्यायालयाने वकिलांची कान उघाडणी करीत फर्लो अर्ज फेटाळून लावला. दोन्ही कैद्यांना १९९६ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात विविध कलमांतर्गत एकूण ५५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ते सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अर्जदारांच्या वतीने अॅड. यांनी बाजू मांडली. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AhDvNB

No comments:

Post a Comment