Breaking

Monday, June 28, 2021

खासगी रुग्णालयांतील लसीकरण घटले; 'हे' आहे कारण https://ift.tt/3jnKcYd

म. टा. विशेष प्रतिनिधी, करोना संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाचा वेग धीम्या गतीने वाढत असला तरी खासगी रुग्णालयांतील लसीकरण घटल्याचे दिसत आहे. त्या तुलनेत सार्वजनिक लसीकरण केंद्रांमध्ये अधिक प्रमाणात लसीकरण झाले आहे. लशींची उपलब्धता आणि मोफत लसीकरणामुळे या केंद्रांना मिळणारा प्रतिसाद अधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील नर्सिंग होम्स तसेच खासगी रुग्णालयांच्या चालकांनी सुमारे ५० लाख लशींची नोंदणी उत्पादकांकडे केली होती. मात्र प्राधान्याने सार्वजनिक क्षेत्रामध्ये असलेल्या रुग्णालयांची ऑर्डर पूर्ण करण्यात येईल, असे उत्तर पहिल्या टप्प्यात देण्यात आले. त्यानंतर आलेली नोंदणीही नियम बदलल्यामुळे पूर्ण करण्यात आली नाही. नव्या नियमांनुसार सरकारकडून २५ टक्के लस उपलब्धता खासगी रुग्णालयांना देण्यात येणार होती. त्यानुसार लशींचे वाटप खासगी रुग्णालयांना होणे अपेक्षित होते. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर खासगी रुग्णालयांना मिळणारा प्रतिसाद अधिक होता, तो आता धीमा झाला आहे. चेंबूर, मुलुंड, भांडुप, अंधेरी, बोरिवली, दहिसर येथील अनेक खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे सांगितले, असे डॉ. दीपक बैद म्हणाले. अनेक कंपन्या, कॉर्पोरेट कार्यालयांसह सोसायट्यांनी लसीकरणाची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. तिथे सवलतीच्या दरात किंवा नि:शुल्क लसीकरण केले जाते. त्यामुळे स्वतःसह कुटुंबाचे लसीकरण येथे करून घेण्याची तयारी अनेक मुंबईकरांनी दाखवली. कुटुंबातील सर्वांचे लसीकरण करून घ्यायचे असेल तर खासगी रुग्णालयांतील खर्च परवडत नाही, अशी प्रतिक्रिया चेंबूर येथे राहणाऱ्या गजानन मोहिते यांनी दिली. खर्च परवडत नाही करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन लसीकरणासाठी जे मनुष्यबळ देण्यात येते ते अन्य वैद्यकीय बाबींसाठी वापरता येत नाही. अनेक वैद्यकीय कर्मचारी दूरवर राहतात. काही रुग्णालयांनी त्यासाठी खासगी वाहनव्यवस्था तसेच निवासाचीही सोय केली आहे. हा खर्च लसीकरणासाठी मिळणारा प्रतिसाद पाहता परवडत नाही. त्यामुळेही खासगी रुग्णालयांनी लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉक्टर्स नेटवर्कच्या श्रीधर मनजीत यांनी सांगितले. सोमवारी ५७ टक्के लसीकरण सोमवारी पालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये ५७ टक्के लसीकरण झाले. त्यात ६६,०९७ जणांनी पहिली मात्रा घेतली असून दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या २१,३२२ इतकी होते. खासगी रुग्णालयांमध्ये ३९ टक्के जणांचे लसीकरण झाले असून ५१ हजार जणांनी पहिली मात्रा, तर ८,५४९ जणांनी दुसरी मात्रा घेतली. पालिकेच्या एकूण २६६ केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असून खासगी रुग्णालयांमध्ये ८९ ठिकाणी लसीकरण सुरू आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3h2zULD

No comments:

Post a Comment