Breaking

Thursday, June 3, 2021

सर्व महाविद्यालयांत साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन; राज्य सरकारचा निर्णय https://ift.tt/3pferS8

मुंबई: या वर्षापासून राज्यातील सर्व महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांमध्ये साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेकाचा असून राज्यात तो सर्वत्र साजरा केला जाणार आहे. ही माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी दिली आहे. ( will be celebrated in all colleges) राज्यातील सर्व महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याबाबतचा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने काढला आहे. या अध्यादेशानुसार शिवकालीन विषयांवर महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, यांनी या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवराज्याभिषेकाच्या अध्यादेशीच प्रत सामंत यांनी खासदार संभाजीराजे यांना दिली. संभाजीराजे यांनी या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे आभार मानले. हा राष्ट्रीय उत्सव व्हावा- संभाजीराजे ६ जून हा राज्याभिषेाकाचा दिवस खरे तर राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा होण्याची आवश्यकता असल्याचे मत संभाजीराजे यांनी मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती आजच्या पिढीला मिळणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार होणे गरजेचे आहे आणि शासनाचा हा निर्णय ही त्याचीच सुरुवात आहे, असे संभाजीराजे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- याबाबत खासदार संभाजीराजे यांनी देखील ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिंक दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये संभाजीराजे म्हणतात, 'शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्यत्व सुरू करण्याची इच्छा हजारो शिवभक्तांनी व्यक्त केली, त्याप्रमाणे पुढील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले.' क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uPzJab

No comments:

Post a Comment