Breaking

Monday, June 28, 2021

नालेसफाईचे शंभर कोटी कुठे गेले?; काँग्रेसची आयुक्तांकडे चौकशीची मागणी https://ift.tt/3qwB0Cp

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात , राष्ट्रवादी काँग्रेस, यांची महाविकास आघाडी असली तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत, असे स्पष्ट करत पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने शिवसेनेला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरील खड्डे, मालमत्ता करवाढीचा निर्णय, नालेसफाईतील कथित भ्रष्टाचार असे मुद्दे उपस्थित करत नालेसफाईसाठी खर्च झालेले १०० कोटी रुपये गेले कुठे, असा प्रश्न काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. या विषयाच्या निमित्ताने जगताप यांनी शिवसेनेलाच अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबईतील विविध समस्यांबाबत पालिका मुख्यालयात सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबद्दल यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आहे. मुंबईत २५ टक्केदेखील नालेसफाई झालेली नाही, हे पहिल्याच पावसात उघडकीस आले. दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई करूनही पाणी तुंबते. त्यामुळे नालेसफाईसाठी खर्च झालेले पैसे नेमके कुठे गेले, याची पालिका आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रभाग पुनर्रचना करण्याबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल निवडणूक आयोगाने सकारात्मक निर्णय घेतल्याने जगताप यांनी आयोगाचे आभार मानले. पालिकेच्या २०१७च्या निवडणुकीपूर्वी केलेले प्रभागांचे सीमांकन संपूर्णतः सदोष व भाजप सरकारच्या दबावाखाली तयार करण्यात आले होते. ती प्रभाग रचना निवडणूक आयोगाने दिलेल्या मापदंडानुसार करण्यात यावी, असे जगताप म्हणाले. करोनाकाळात बेस्ट कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मुंबईकरांना सेवा दिली. त्याच बेस्टला आता बिकट परिस्थितीतून जावे लागत आहे. मागील २ ते ४ वर्षांमध्ये जे बेस्टचे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत, त्यांची ४०६ कोटीची ग्रॅच्युईटीची रक्कम अजून मिळालेली नाही. ही रक्कम मिळायलाच हवी अशी आमची मागणी आहे. प्रशासनाची त्याबाबत बेस्टला ४०६ कोटी कर्ज देण्याची प्रशासनाची तयारी आहे. शासनाने हे पैसे कर्ज म्हणून नाही, तर अनुदान म्हणून द्यावे, अशी मागणी जगताप यांनी केली. मालमत्ता कर ५ वर्ष स्थगित करावा पालिकेने मालमत्ता करवाढीचाही घाट घातला होता. मात्र याला काँग्रेसने जोरदार विरोध केल्यामुळे करवाढीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला, असा दावा जगताप यांनी केला. मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव वर्षभरासाठी स्थगित न करता तो पुढील ५ वर्षांसाठी स्थगित करण्यात यावा, अशी मागणी जगताप व रवी राजा यांनी केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jkH4MR

No comments:

Post a Comment