नवी दिल्ली : स्पेनने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या आजच्या सामन्यात क्रोएशियाला जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. स्पेनच्या आक्रमकपटूंनी यावेळी दमदार कामगिरी केली. स्पेनने यावेळी नेत्रदीपक खेळ करत क्रोएशियावर ५-३ असा विजय मिळवला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांची ३-३ अशी बरोबरी झाली होती. पण त्यानंतर झालेल्या अर्ध्या तासाच्या अतिरीक्त वेळेत स्पेनने धडाकेबाज खेळत करत विजय साकारला. या सामन्यात स्पेनला सुरुवातीला जोरदार धक्का बसला होता. कारण सामन्याच्या स्पेनच्या पेड्रीने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू मारला आणि क्रोएशियाला आयता गोल मिळाला. स्पेनला ही मोठी चुक चांगलीच भोवणार, असे वाटत होते. कारण त्यानंतर बराच वेळ स्पेनला गोल करण्यात अपयश आले आणि ते ०-१ अशा पिछाडीवर होते. पण त्यानंतर स्पेनच्या संघाला गोल करता आला नव्हता. स्पेनला जवळपास ३७ मिनिटे यश मिळाले नव्हते. पण त्यानंतर पाबलो साराबियाने दमदार गोल केला आणि स्पेनच्या गोलचे खाते उघडले. या गोलसह स्पेनने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली होती. त्यानंतर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला, पण दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. त्यामुळे मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केली होती. दुसरे सत्र स्पेनने चांगलेच गाजवले. कारण या दुसऱ्या सत्रात त्यांनी आक्रमक खेळ केला. स्पेनच्या सीझर अॅझपिलीक्युएटाने सामन्याच्या ५८ व्या मिनिटा गोल केला. या गोलमुळे स्पेनला सामन्यात २-१ अशी आघाडी घेता आली होती. पण फक्त २-१ या आघाडीवर स्पेनचा संघ थांबला नाही. स्पेनने त्यानंतरही जोरदार आक्रमण सुरुच ठेवले होते आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळाले. स्पेनच्या फेरान टोरेसने सामन्याच्या ७६व्या मिनिटाला गेल केला आणि स्पेनशी आघाडी ३-१ अशी वाढवली. त्यानंतर स्पेनच्या मिसलाव्हने गोल केला क्रोएशिया आता फक्त एक गोलने पिछाडीवर होता. अतिरीक्त वेळेत स्पेनचा संघ गोल करुन सामन्यात ३-३ अशी बरोबरी करणार का, याची उत्सुकता यावेळी चाहत्यांना नक्कीच होती. क्रोएशियाच्या मारिओने अतिरीक्त वेळेत गोल केला आणि सामना ३-३ असा बरोबरीत झाला. आता हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण त्यानंतर खेळवण्यात आलेल्या ३० मिनिटांच्या अतिरीक्त वेळेत स्पेनच्या अल्वारो आणि मिकेल यांनी गोल केला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hgJPw0
No comments:
Post a Comment