Breaking

Monday, June 28, 2021

भारतीयांच्या संतापाने ट्वीटर ताळ्यावर, अखेर चुकीचा नकाशा हटवला https://ift.tt/3qvgm5J

नवी दिल्लीः ट्वीटरने ( ) आपल्या सोशल मीडिया साइटवरून भारताचा चुकीचा नकाशा अखेर हटवला ( ) आहे. ट्वीटरने भारताचा चुकीचा नकशा दाखवल्याने भारतीय संताप झाला. अनेक नागरिकांनी ट्वीटरवर कडक कारवाईची मागणी केली होती. जम्मू-काश्मीर आणि लडाखला ( ) भारतापासून वेगळे दाखवणारा चुकीचा नकाशा ट्वीटरने आपल्या साइटवर दाखवला होता. ट्वीटरने आपल्या साइटवर जो नकाशा दाखवला होता त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगळा देश दाखवण्यात ( ) आले होते. हा नकाशा ट्वीटरच्या करिअर पेजवर होता. या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळे दाखवण्यात आले होते. एका यूजरने हा ट्वीटरच्या विकृतीचा भंडाफोड केला. यानंतर भारतांचा संताप व्यक्त केला. अनेकांनी ट्वीटरवर सडकून टीका केली. चुकीचा नकाशा दाखवल्याने ट्वीटरवर कठोर कारवाई करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्र सरकार आणि ट्वीटरदरम्यान सुरू असलेल्या वादात हे नवे प्रकरण समोर आल्याने ट्वीटर गोत्यात येण्याची शक्यता आहे. ट्वीटरने आपल्या साइटवरून भारताचा चुकीचा नकाशा हटवला असला तरी ही गंभीर चूक आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला ठेच पोहोचवणारी आहे. यामुळे केंद्र सरकार या प्रकरणी आता कुठली मोठी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3w2kLhu

No comments:

Post a Comment