Breaking

Friday, June 4, 2021

पी-३०५ बार्जचे कॅप्टन राकेश बल्लव यांचा मृत्यूच; डीएनए मुलाशी जुळला https://ift.tt/3z1ClVC

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई मुंबई हाय येथे बुडालेल्या पी ३०५ या बार्जचे या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे अखेर डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. जेजे रुग्णालयात ओळख न पटल्याने बेवारस अवस्थेतील एक मृतदेहाचा डीएनए बल्लव यांच्या मुलाशी जुळल्याची माहिती येलो गेट पोलिसांनी दिली. (it has been revealed that of has died his son) 'तौक्ते' वादळ मुंबईच्या किनारपट्टीवरून जाणार असल्याने हवामान खात्याने तसेच शासनाच्या वतीने सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पी ३०६ बार्ज बुडाला आणि सुमारे ७० जणांचा मृत्यू झाला. बार्जवरील मुख्य अभियंता मुस्तफिर रेहमान हुसेन शेख याच्या जबाबावरून याप्रकरणी यलो गेट पोलिस ठाण्यात राकेश बल्लव आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- काही दिवसांपूर्वी बल्लव कुटुंब जेजे रुग्णालयात मृतदेहाची ओळ्ख पटविण्यासाठी आले होते. तेव्हा एक मृतदेह बल्लव यांचा असावा, असा अंदाज कुटुंबाने व्यक्त केला. मात्र कुटुंबाने खात्री न दिल्याने पोलिसांनी निव्वळ अंदाजावर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात न देण्याचा निर्णय घेतला. डीएनए चाचणीसाठी त्यांच्या मुलाचा नमुना घेत तो चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला. नौदलाने शोधलेल्या मृतदेहांपैकी एकाशी बल्लव यांचा डीएनए जुळल्याचे पोलिसांना कळवले. मात्र हा मृतदेह बल्लव यांचाच आहे का, याबाबत कुटुंबाला अद्यापही खात्री नाही. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wTQen1

No comments:

Post a Comment