Breaking

Tuesday, June 29, 2021

PM मोदींचे कौतुक करणारे ट्वीट; शत्रुघ्न सिन्हांनी सोडले मौन, म्हणाले... https://ift.tt/3Aap2mk

पाटणाः पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्वीटमधून केलेल्या स्तुतीवर काँग्रेसने ( ) यांनी सफ्ष्टीकरण दिलं आहे. आपल्या कमेंटकडे एक हास्य म्हणून बघितले पाहिजे. आपल्याला काँग्रेसमधून पुन्हा भाजपमध्ये जाण्याची कुठलीही इच्छा नाही, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. भाजपचे माजी खासदार आणि नंतर काँग्रेसवासी झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमधून सिन्हांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्याचं बोललं गेलं. यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे घरवापसीच्या मूडमध्ये असल्याची राजकीय चर्चा रंगली. पण आपल्या ट्वीटचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपमध्ये पुन्हा जाण्याचा आपला कुठलाही विचार नाही. आपण ट्वीटमधून केलेली टिपणी ही एक हास्य केली होती. पक्ष बदलण्याची कुठलीही इच्छा नाही, असं सिन्हा यांनी सांगितलं. त्या ट्वीटमध्ये काय म्हणाले होते शत्रुघ्न सिन्हा? मी काँग्रेस सोडणार नाही सिन्हा हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि भाजपमध्ये जाण्याचा मार्ग शोधत आहेत, असा वरील ट्वीटचा अर्थ काढला जात होता. पण सिन्हा यांनी सर्व तर्क खोडून काढले आहेत. आपण केले ट्वीट हे मनोरंजन म्हणून रविवारचे एक हास्य होते. प्रत्येक रविवारी आपण मनोरंजन म्हणून एक ट्वीट करतो. त्यांचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये. आपण काँग्रेस सोडणार नाही आणि पुन्हा भाजपमध्ये जाण्याची कुठलीही इच्छा नाही, असं सिन्हा यांनी स्पष्ट केलं. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये शत्रुघ्न सिन्हा हे केंद्रीय मंत्री होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी पाटणा साहिबमधून निवडणूकही लढवली. पण त्यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि बिहार विधानसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवाने शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये कुठल्याही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले नाही. आपण भाजप सोडली आहे. पण अजूनही भाजपमध्ये आपले अनेक चांगले मित्र आहेत. नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आपण विरोध केला आहे. भाजप सोडली आहे आणि अजूनही त्यावर ठाम आहे, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. गेल्या दोन लोकसभा निवडणुकी काँग्रेसचा परभाव झाला. पण काँग्रेस सत्तेत पुन्हा येऊ शकते. भाजपकडेही कधीकाळी दोनच खासदार होते. हे आपण विसरता कामा नये, असं शत्रुघ्न सिन्हांनी सांगितलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3x0Em2Z

No comments:

Post a Comment